अबूझमाड जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक : दोन महिला नक्षली ठार

726

– घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता
The गडविश्व
नारायणपूर (छ.ग), दि. २६ : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अबूझमाड जंगल परिसरात बुधवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. DRG (District Reserve Guard) आणि STF (Special Task Force) च्या संयुक्त कारवाईत नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून, 315 बोर रायफलसह अन्य शस्त्रास्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत.
कोहकामेटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांची हालचाल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नारायणपूर येथून DRG व कोंडागाव येथून STF चे जवान संयुक्तरित्या कारवाईसाठी रवाना झाले. जंगल परिसरात पोहोचताच बुधवारी रात्री उशिरा जोरदार चकमक उडाली. जवानांनीही प्रतिउत्तरात गोळीबार करत कारवाई तीव्र केली.
दरम्यान गुरुवारी सकाळी सर्च ऑपरेशन दरम्यान दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. परिसरात अजूनही सुरक्षा दलांची मोठी कुमक तैनात असून नाकेबंदी कडेकोट करण्यात आली आहे. जंगलात अन्य नक्षलवादी लपलेले असण्याची शक्यता असल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरूच असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे . आज सकाळीही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. https://x.com/ANI/status/1938153584153268607?s=19
या कारवाईमुळे नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि सुरक्षा दल सतर्क आणि सज्ज आहेत. आगामी काळात नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #NaxalEncounter #ChhattisgarhNaxal #NaxalNews #PoliceAction #SecurityForces #DRG #STF #NarayanpurNews #NaxalismFreeIndia #JungleEncounter
#अबूझमाड_चकमक #नक्षलविरोधी_कारवाई #अबूझमाड_ऑपरेशन #शस्त्रसाठा_जप्त #छत्तीसगड_नक्षल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here