– दुर्गम भागातील विकासाचा नवा अध्याय
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या अभिनव उपक्रमांतर्गत दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणाऱ्या Village Level Entrepreneur (V.L.E.) युवक-युवतींसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.
सदर कार्यशाळेत एकूण ३७ V.L.E. प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. C.S.E. मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत — आयुष्यमान भारत, लाडकी बहिण योजना, पिक विमा योजना, ई-श्रम कार्ड, पेंशन सेवा, आभा कार्ड, बँकिंग सेवा आदींबाबत माहिती देण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक V.L.E. ने आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवाव्यात. दुर्गम भागातील शेवटचा नागरिक हा आपल्या सेवेमुळे जोडला जावा, हीच खरी जबाबदारी आहे. तुम्हीच प्रशासनाचा चेहरा आहात.”
कार्यक्रमात C.S.E. जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील सोनटक्के, प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हा प्रतिनिधी राकेश रायलालवार, तसेच आयुष्यमान भारत योजना जिल्हा प्रतिनिधी सुमेध आजेगावकर यांनीही उपस्थित V.L.E. ना मार्गदर्शन केले.
‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट प्रगती, प्रोजेक्ट विकास, प्रोजेक्ट उडाण, प्रोजेक्ट उत्थान, आणि प्रोजेक्ट कृषी समृद्धी या उपक्रमांद्वारे पोलीस अंमलदार आणि V.L.E. यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आतापर्यंत १०,४६,२८४ नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यात आला आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि इतर पोलीस अंमलदारांनी विशेष प्रयत्न केले.

#thegdv #thegadvishva #GadchiroliPolice #PoliceDadaloraKhidki #VLEWorkshop #RuralDevelopment #CommunityPolicing #GovernmentSchemes #AyushmanBharat #CSEGadchiroli #DigitalInclusion #RemoteAccess
#गडचिरोलीपोलीस #पोलीसदादालोराखिडकी #VLEकार्यशाळा #दुर्गमविकास #शासकीययोजना #कम्युनिटीपोलीसिंग #गडचिरोलीविकास #आयुष्यमानभारत #पिकविमायोजना #सीएसईगडचिरोली