The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात १० एप्रिलला २०२४ रोज बुधवारला मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेषज्ञ ओपीडी करीता दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील मुत्रविकार व त्वचाविकार विशेषज्ञ सर्च रुग्णालय चातगाव येथे रुग्णसेवा देण्याकरीता येणार आहेत.
मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन/मुत्रखडा व लघवीमधून रक्तस्त्राव होणे ही लक्षणे असल्यास मूत्रविकार तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच शरीरावर पांढरा चट्टा कोड व खाज, मुरूम/ तारुण्यपिटिका, केस गळती, कोंडा होणे, गजकर्ण, खरूज, सोरायसिस, नखांचे आजार तसेच नागिन ही लक्षणे असल्यास त्वचाविकार ओपीडी मध्ये उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. तरी या दोन्ही विशेषज्ञ ओपीडीमध्ये गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावे, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipatj #election2024)