– सोपानदेव मशाखेत्री अध्यक्षपदी, एकमताने निवड
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : धानोरा येथील विश्रामगृहात तालुका प्रिंट मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक ज्येष्ठ पत्रकार सोपानदेव मशाखेत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकमताने संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी सोपानदेव मशाखेत्री यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर लोकमतचे प्रतिनिधी घनश्याम मशाखेत्री यांची उपाध्यक्ष, नवभारतचे समीर कुरेशी यांची सचिव, देशोन्नतीचे तुफान उंदीरवाडे यांची कार्याध्यक्ष, आणि पुण्यनगरीचे सुरेश क्षिरसागर यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
सदस्य म्हणून सकाळचे भाविकदास करमणकर, तरुण भारतचे दिवाकर भोयर, युवा राष्ट्र दर्शनचे अभय इंदुरकर, दैनिक भास्करचे रितेश मशाखेत्री, तसेच लोकमत समाचारचे शरीफ कुरेशी यांचा समावेश करण्यात आला.
सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते आणि सौहार्दपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, “एकदिलाने व एकजुटीने काम करूया,” असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव समीर कुरेशी यांनी केले.
