The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे राबविला जात आहे. याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक केंद्र शाळा, मुरुमगाव येथे नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणली जात आहे.
शाळेतील पदवीधर शिक्षक चंदू रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी सुटीत ग्रुप स्टडी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थी आपल्या परिसरात एकत्र येऊन अभ्यास करतात, एकमेकांच्या अडचणी सोडवतात आणि स्वाध्याय पूर्ण करतात.
शिक्षणातील या अभिनव प्रयोगाला मुख्याध्यापक रेवनाथ चलाक यांच्यासह शिक्षक वर्गाने उर्जा दिली आहे. गायत्री खेवले, रुपेश शिवणकर, जगदीश बावणे, सुमन किरंगे, कविता शेडमाके आणि संगिता भडके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-अभ्यासाची सवय लागेल आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास शिक्षक वर्गाने व्यक्त केला आहे.

#thegadvishva #thegdv #gadchirolinews
#शिक्षण #नाविन्यपूर्णउपक्रम #SQAAF #ग्रुपस्टडी #गुणवत्ताशिक्षण #शाळाविकास #विद्यार्थी #शिक्षणसुधारणा #Education #InnovativeInitiative #SQAAF #GroupStudy #QualityEducation #SchoolDevelopment #Students #EducationalReform