– जनतेचा संताप, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : तालुक्यातील रांगी–निमगाव व बोरी मार्गावरील नाल्यावर बांधण्यात आलेले नव्या पुलियाचे बांधकाम पहिल्याच पावसात फसले आहे. उंची कमी असल्याने पाणी थेट पुलावरून वाहत असून, वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवासी रोजचा प्रवास जीव धोक्यात घालून करत आहेत.
मागील पावसाळ्यात जुन्या रपट्याला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. ठिकठिकाणी खोल खड्डे, बाहेर आलेल्या लोखंडी सळाक्या यामुळे अपघातांचा धोका वाढला होता. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने घाईघाईत डागडुजी केली, मात्र ती फक्त कागदोपत्री ठरली. नव्याने बांधलेले पुलियेही पहिल्याच पावसात निष्प्रभ ठरल्याने नागरिक संतप्त आहेत.
जेथे उंच व मजबूत कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम गरजेचे होते, तेथे केवळ डागडुजीचा दिखावा करून कोट्यवधींचा निधी पाण्यात घालवण्यामागे कोणाचा फायदा? असा संतप्त सवाल स्थानिक करीत आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, १५ वर्षांपूर्वी बांधलेला पूल दुर्लक्षामुळे मोडकळीस आला, आणि आता नव्याने बांधलेले पुलियेही त्या दिशेनेच वाटचाल करत आहे. तातडीने उंच, मजबूत आणि सुरक्षित पूल बांधून हा जीवघेणा धोका दूर करा अशी जनतेची ठाम मागणी आहे. अन्यथा होणाऱ्या अपघाताला प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच जबाबदार असतील.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews
