The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २८ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आज बुधवार २८ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर कोल्हे, जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे, प्रकाश मुंगनकर, संघमित्रा कांबळे हे होते .
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी चंद्रशेखर वेंकट रामण यांच्या जीवनकार्यावर तसेच त्यांच्या जीवनातील वैज्ञानिक शोधकार्याविषयी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली .
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील शिक्षक भीमराव सोरते तसेच आभार लीकेश कोडापे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता बहुसंख्येने विद्यार्थी तसेच विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
