The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि.१२: धानोरा येथील श्री जे. एस. पी. एम. महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक, पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थूल यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. राजू किरमिरे आणि डॉ. विना जंबेवार उपस्थित होते.
ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. प्रवीण गोहणे यांनी प्रस्ताविकेतून डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय क्षेत्रातील कार्याची आठवण करून दिली. प्राचार्य डॉ. उदय थूल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संच नसून एक चळवळ आहे. ग्रंथपालाने अधिक सजग राहून तत्पर सेवा दिल्यासच ग्रंथालयाचा खरा उद्देश साध्य होईल.”
डॉ. विना जंबेवार व डॉ. राजू किरमिरे यांनी डिजिटल युगातही पारंपारिक ग्रंथालयाचे महत्त्व कायम असल्याचे सांगत, डॉ. रंगनाथन यांच्या योगदानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीण गोहणे यांनी तर आभार डॉ. प्रियंका पठाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती छाया चंदेल व भास्कर वाढणकर यांनी विशेष सहकार्य केले.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice
