– नागरिकांची आर्थिक फसवणूक
The गडविश्व
मुंबई / कोल्हापूर, दि. २३ : महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेली ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ बाबतची पोस्ट पूर्णतः खोटी आणि बनावट असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही.
या बनावट पोस्टमध्ये इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची खोटी स्वाक्षरी वापरण्यात आली आहे. संबंधित मुख्याध्यापिकांनी स्वतः पुढे येऊन हा मेसेज खोटा असून, शाळेचा किंवा त्यांचा योजनेशी कोणताही संबंध नाही, हे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात या फसव्या पोस्टचा मोठा परिणाम जाणवत असून, अनेक पालक आणि नागरिकांनी यावर विश्वास ठेवून फॉर्म भरल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी तर या खोट्या योजनेच्या नावाखाली अर्ज भरून लाभ मिळवून देतो असे सांगणारे बनावट एजंटही सक्रिय झाले आहेत.
यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागली असून आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत.
शालेय शिक्षण विभाग आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बनावट योजना वा व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शासकीय योजना असल्यास अधिकृत संकेतस्थळ किंवा स्थानिक शासकीय कार्यालयामार्फत खात्री करूनच कृती करावी.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #FakeScheme #FactCheck #EducationDepartment #ViralFraud #RuralScam #CMChildBlessingScheme #SocialMediaHoax #PublicAlert #FakePost #GovernmentClarification #BewareOfFraud #FalseInformation #NoSuchScheme #MaharashtraEducation #ScamAwareness
#FactCheck | #FakeScheme | #PublicAlert | #EducationDept | #MaharashtraGovt | #GraminFasavnuk
#खोटीयोजना #फॅक्टचेक #शिक्षणविभाग #ग्रामिणफसवणूक #मुख्यमंत्रीबालआशीर्वाद #व्हायरलखोटेपण #फसव्या पोस्ट #सावध रहा #शासकीयमाहिती #बनावटयोजना #नागरिकसावधता #शासकीयखुलासा #सोशलमीडियाफेक #गावागावातफसवणूक
