रस्त्याची दयनीय अवस्था पाहून आमदार मसराम भडकले ; ठेकेदाराला चिखलातून चालविले

97

– गोठणगाव-कोरची रस्त्याच्या दलदलीवर आमदारांची थेट कारवाई, तातडीच्या दुरुस्तीचे आदेश
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव-कोरची टी पॉइंट रस्ता सध्या अक्षरशः दलदल बनला असून, खड्डे आणि चिखल यामुळे वाहनचालक, शाळकरी मुले, रुग्ण व सामान्य प्रवासी यांचे हाल सुरू आहेत. याबाबत समजताच आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि रस्त्याची दयनीय स्थिती पाहून थेट बांधकाम कंपनीच्या मॅनेजरला चिखलातून चालवत सडेतोड इशारा दिला.
पाहणीदरम्यान ६ ते ७ ट्रक रस्त्यात अडकून असल्याचे लक्षात आले. चिखलामुळे वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती. आमदार मसराम यांनी राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर तिनखेडे यांना चिखलातून चालवत नेले आणि यंत्रसामग्री लावून तात्काळ वाहने बाहेर काढण्याचे आदेश दिले.
तर सद्यस्थितीतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आमदारांनी स्पष्ट केले. रस्त्याची तात्काळ व दर्जेदार डागडुजी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
कोरची, गोठणगाव, मालेवाडा, कढोलीसह अनेक गावांचे दळणवळण या रस्त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे याची कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी पुन्हा केली.
आमदार मसराम यांच्या थेट कारवाईमुळे आणि चिखलात उतरून पाहणी केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून, एका खऱ्या लोकप्रतिनिधीची ही भूमिका असल्याचे गौरवोद्गार ग्रामस्थांनी काढले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी सभापती परसरामजी टिकले, प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम, ठाणेदार वाघ, नायब तहसीलदार धनबाते, जयंत हरडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, सागर वाढई, कमलेश बारस्कर, परशुराम ठाकरे व शेकडो स्थानिक नागरिक व विद्यार्थी.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here