आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची हेटी तलावाला भेट

82

The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १९ : धानोरा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हेटी तलावाची पाहणी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी १८ मे २०२५ रोजी केली.
या दौऱ्यात त्यांनी तलावातील सध्याच्या पाणीसाठ्याची, आवश्यक सोयी-सुविधांची आणि पाणीपुरवठा यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली. पूर्वी याच तलावातील पाणी परिसरातील शेतीसाठी तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी वापरले जात होते. हा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तसेच, या परिसराचे सौंदर्यीकरण करून त्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा मानसही आमदार नरोटे यांनी व्यक्त केला, जेणेकरून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि विकासास चालना मिळेल.
या पाहणी दौऱ्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते अनंतजी साळवे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सारंगजी साळवे, शुभाषजी धाईत, शुभाषजी खोबरे, संजयजी कुंडू, हरिशजी माकडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धानोरा व परिसरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here