– अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचा खबरदारीचा निर्णय
The गडविश्व
चंद्रपूर, दि. २४ : भारतीय हवामान खात्याने २५ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य आपत्तीस्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस २५ जुलै २०२५ रोजी बंद राहतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदींनुसार हे आदेश जारी करण्यात आले असून, संबंधित संस्थांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार सतर्क राहावे व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी – ०७१७२ २५००७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #chandrpurnews #चंद्रपूर #रेडअलर्ट #हवामानइशारा #शाळा_सुट्टी #महाविद्यालय_बंद #जिल्हाधिकारी_आदेश #अतिवृष्टी #आपत्तीव्यवस्थापन #WeatherAlert #SchoolHoliday #ChandrapurNews #RainAlert #EmergencyClosure
