जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटात सहभाग असलेला उपकमांडर माओवादी जेरबंद

1702

जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटात सहभाग असलेला उपकमांडर माओवादी कवंडे जंगलातून जेरबंद
– ६ लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफने कवंडे जंगल परिसरात मोठी कामगिरी करत घातपाताच्या तयारीत असलेला आणि जांभूळखेडा येथील भूसुरुंग स्फोटात सक्रिय सहभाग असलेला माओवादी उपकमांडर अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (वय 28) याला अटक केली आहे. या स्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाले होते. त्याच्या अटकेवर महाराष्ट्र शासनाने 6 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
27 जून रोजी कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत जंगल भागात नक्षलविरोधी संयुक्त मोहिमेदरम्यान ही कारवाई पार पडली. रेकी करत असलेल्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशीत त्याची ओळख पटली. तो कोरची दलमचा उपकमांडर असून गेल्या अनेक वर्षांपासून घातपात घडवून आणण्यासाठी गुप्त हालचाली करत होता.

माओवादी कारकीर्द :

2012 ते 2017 : छत्तीसगडमधील निब कंपनीत सदस्य
2017 : भामरागड दलममध्ये सदस्य
2017 ते 2020 : कोरची दलममध्ये उपकमांडर
2020 पासून : कवंडे जंगल परिसरात लपून रेकी व पोलिस हालचालींचा मागोवा

तो 1 मे 2019 रोजी जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात सहभागी होता, ज्यात 15 जवान शहीद झाले होते. याशिवाय त्याच्यावर तीन चकमकी व दोन खून असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला खोब्रामेंढा येथील चकमकीतील गुन्ह्यातून अटक करण्यात आली असून 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2022 पासून गडचिरोली पोलिस दलाने आतापर्यंत 104 माओवादी अटक केले असून, ही अटक माओवादी संघटनेच्या हालचालींना मोठा धक्का मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जंगल परिसरात माओवादविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliPolice #MaoistArrested #JambhulkhedaBlast #NaxalEncounter #CRPF #AntiNaxalOperation #RedTerror #MaoistCommanderCaught #GadchiroliNews #NaxalWatch #SecurityForcesVictory #MaharashtraPolice
#गडचिरोलीपोलीस #माओवादीअटक #जांभूळखेडास्फोट #नक्षलविरोधीकारवाई #सीआरपीएफ #माओवाद्यांविरोधातमोहीम #रेडटेरर #उपकमांडरअटक #गडचिरोलीबातमी #पोलीसयश #सुरक्षादलविजय #महाराष्ट्रपोलीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here