The गडविश्व
कुरखेडा, दि. १२ : विकास विद्यालय तथा थोरवी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ११ एप्रिल २०२५, शुक्रवार रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि स्त्री शिक्षणातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा शील करुणा मंडळ या संस्थेचे सहसचिव अनिकेत पी. आकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. अलगदेवे, थोरवी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. कु. पी. आर. खेत्रे आणि प्रा. बि. डी. सहारे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात प्रा. सहारे यांनी महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा आणि आधुनिक भारताच्या निर्मितीतले योगदान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना समतेचा संदेश देत त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमास दोन्ही संस्थांतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सायली मस्के मॅडम यांनी तर आभार प्रा. डोंगरवार यांनी मानले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda )