The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०१ : जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी शाळेचे ध्वजारोहण प्रभारी मुख्याध्यापक पी. व्ही. साळवे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, सदस्य कोडापे, उषाताई हलामी, वैशाली मशाखेत्री, खुशाल मडावी, पांडुरंग पोवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व, राज्याच्या विकासयात्रेचा इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाबाबत “पाणी वाचवा – पर्यावरण वाचवा” या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.
