The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : तालुक्यातील मुरुमगाव येथील स्व. रामचंद्रजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी के. आर. दखणे आदिवासी विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष कमलबाई दखणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्था सदस्य कृपारामजी भूरकुरिया, मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर, ज्येष्ठ शिक्षक महेंद्र जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेच्या वार्षिक निकालाची घोषणाही करण्यात आली. परीक्षा प्रमुख सतीश सुरणकर यांनी निकाल जाहीर केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घनश्याम चिंचोलकर यांनी तर यशस्वी आयोजनासाठी विलास चौधरी, संजय पोहाणे, रामाधर राणा, सुरेश तुलावि व रमेश निसार यांचे मोलाचे योगदान लाभले.
