The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : शहरातील ऐतिहासिक कारगील चौकात ६८ वा महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे – सार्वजनिक ठिकाणी महिलांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आणि त्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला.
कारगील दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सौ. नलिनी सुनील देशमुख यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उदय धकाते (अध्यक्ष), रेवनाथ गोवर्धन (उपाध्यक्ष), विजय साळवे, संजय गद्देवार, रुपेश सलामे, महेंद्र मसराम, वासनिक, सुचिता धकाते, प्रा. सुनीता साळवे, वंदना वाणी, मुख्याध्यापिका मीरा मडावी आणि भोयर यांचा समावेश होता.
शिक्षक गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन सादर केले. गुरुदेव उच्च श्रेणी प्राथमिक शाळा आणि राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे महिलांच्या सन्मानासह संविधान मूल्यांची उजळणी झाली असून, संपूर्ण शहरात या कार्यक्रमाची सकारात्मक चर्चा आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #MaharashtraDay2025 #कारगीलचौक #महिला_ध्वजारोहण #गडचिरोली #ConstitutionAt75 #समानतेचा_झेंडा #PublicLeadership #HistoricFirst #MaziMatiMazaDesh