The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या हस्ते सकाळी 6.45 वा. ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण व श्रद्धांजली वाहून झाली. विशेषतः 1 मे 2019 रोजी माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस दलातील 138 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले असून त्यापैकी 40 जणांना याप्रसंगी प्रतिकात्मक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचाही समावेश होता.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सकाळी 8.00 वा. मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहीद कुटुंबीय उपस्थित होते. पोलीस दलाने आयोजित केलेले पथसंचलन लक्षवेधी ठरले.
प्रभारी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी मनोगतात पोलीस दलाच्या कार्यशैलीचे कौतुक करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शहीद कुटुंबीयांच्या समस्या समजून घेतल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकारी व अंमलदारांनी विशेष मेहनत घेतली.

#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice