The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०२ : श्री. शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळ, गडचिरोली संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले. “जगभरातील कामगार चळवळींना सन्मान देणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षांचे स्मरण करणारा हा दिवस ८० हून अधिक देशांत साजरा केला जातो,” असे गौरकार यांनी सांगितले.
या निमित्ताने १ मे २०१९ रोजी पुराडा मार्गावरील जांभूळखेडा येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना उपस्थित सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे, प्रकाश मुंगनकर, नरेंद्र कोहाडे, भीमराव सोरते, लीकेश कोडापे, चंद्रकांत नरुले, सोनिका वैद्य, भूमेश्वरी हलामी, प्राध्यापक विजय मेश्राम, कालिदास सोरते, मनोज सराटे, विवेक गलबले, मुनेश्वर राऊत, निकिता दरवडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ए.एल. बांबोळे, राजेंद्र मिसार, लोकेश राऊत, कालिदास मलोडे, शिवा भोयर, घनश्याम भोयर, अक्षय देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाने देशभक्ती व सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली.
