The गडविश्व
गडचिरोली, दि.१८ : जिल्ह्यात २०२५ या वर्षासाठी पोळा,घटस्थापना आणि नरक चतुर्दशीला स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या २४ जानेवारी २०२५ च्या आदेशानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुट्ट्यांचा तपशील खालीलप्रमाणे
पोळा (पहिला दिवस) : शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी
घटस्थापना : सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी
नरक चतुर्दशी (दिवाळी) : सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात वरील दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या सुट्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालये, तसेच बँकांना लागू होणार नाहीत असेही या आदेशात कळविले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #स्थानिकसुट्ट्या #पोळा #घटस्थापना #नरकचतुर्दशी #जिल्हाधिकारी #सण #सुट्टी
#gadchiroli #holiday #festival #pola #ghatasthapana #narakchaturdashi #districtadministration
