जागतिक आदिवासी दिनानिमित्त लॉईड्स हॉस्पिटलची मोफत एचपीव्ही लसीकरण मोहीम

47

The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत हेडरी येथील लॉईड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) हॉस्पिटलतर्फे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणाऱ्या आजारांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
उद्घाटन लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका ल कीर्ती कृष्णा आणि प्रकल्प संचालिका सुनीता मेहता यांच्या हस्ते झाले. यावेळी वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय, बालरोगतज्ज्ञ डॉ. आकांश रेड्डी आणि वरिष्ठ नर्सिंग अधिकारी कविता दुर्गम उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात ९ ते ११ वर्षांच्या शालेय मुलींना आणि लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना कीर्ती कृष्णा आणि डॉ. रॉय यांनी एचपीव्ही लसीकरणाचे दीर्घकालीन आरोग्य फायदे सांगत, हा उपक्रम गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. लॉईड्स राज विद्या निकेतन टीमने एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक व एलआरव्हीएनचे अध्यक्ष बी. प्रभाकरन आणि कीर्ती कृष्णा यांचे मुलींना मोफत लसीकरणाच्या उपक्रमाबद्दल आभार मानले.
राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम ‘संरक्षणाचा वैज्ञानिक धागा’ ठरल्याचे त्यांनी म्हटले. ९-१४ वर्षांच्या मुलींसाठी दोन डोस आणि १५-२६ वर्षांच्या महिलांसाठी तीन डोसच्या वेळापत्रकानुसार लसीकरण करण्यात येणार असून एलकेएएम हॉस्पिटलचा हा मोफत उपक्रम ग्रामीण व आदिवासी भागात कर्करोग प्रतिबंधासाठी प्रभावी ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #latestnews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here