लोकशाहीचा पाठ शाळेच्या वयातच : न.प शाळेत शालेय मंत्रीमंडळाची रचना

27

लोकशाहीचा पाठ शाळेच्या वयातच : न.प शाळेत शालेय मंत्रीमंडळाची रचना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : शहरातील लांझेड़ा प्रभागातील श्री संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार ३१ जुलै रोजी शालेय मंत्रीमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत १ ली ते ५ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
शाळेत मतदान केंद्र उभारून मतदार नोंदणी, बोटावर शाई, मतपेटी, बॅलेट पेपर या सर्व प्रक्रिया काटेकोरपणे राबवण्यात आल्या. निवडणुकीपूर्वी उमेदवार विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये जाऊन प्रचारही केला. निवडणुकीत रचना युवराव कोवे या विद्यार्थिनीने शालेय नेता म्हणून बहुमताने विजय मिळवला. तर देवांश कुकडकर, दक्ष नैताम, गुरुत्व नैताम, आरोही वनीकर यांचीही मंत्रीमंडळात निवड झाली.
विजयी विद्यार्थ्यांना शपथविधी कार्यक्रमाद्वारे त्यांचे पदभार देण्यात आले. शाळानायक म्हणून रचना कोवे, तर उपनायक म्हणून देवांश कुकडकर यांची निवड झाली. निवडणूक नियंत्रक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रविंद्रकुमार पटले यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी शिक्षक सोनिया जुमनाके, पायल नैताम, अनिल सयाम, कल्याणी ढोके, पौर्णिमा खेवले आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रिया, मतदानाचे महत्व व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #schoolelection

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here