कुरखेडा : सती नदीवरील वाहतूक ठप्प, पर्यायी रस्ते खड्ड्यांनी भरले

185

– तालुका वेठीस; प्रशासन गप्प
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि.२६ : कुरखेडा तालुक्याच्या जनतेवर सध्या अक्षरशः दुहेरी संकट ओढावले आहे. सती नदीवरील जुना पूल बंद, नवीन पुलाचे काम रखडले आणि पर्यायी मार्ग खड्ड्यांनी पोखरले! परिणामी शालेय विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अख्खा तालुका वेठीस धरला गेला आहे. पर्यायी मार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण, कर्मचाऱ्यांसह प्रत्येकचजण या दुर्दशेचा बळी ठरत आहे.

पर्यायी रस्ता की मृत्यूचा सापळा?

कुरखेडा–आंधळी फाटा–वाघेडा–मालदुगी–गोठणगाव फाटा या पर्यायी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे. अरुंद रस्ता, वाहनांची लांबच लांब रांग, पावसामुळे चिखल आणि पाण्याने भरलेले खड्डे – हा रस्ता अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनचालकांसाठी हा जीवघेणा प्रवास बनत चालला आहे.

शासनाचे आदेश, पण अंमलबजावणी शून्य!

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या आदेशानुसार, सती नदीवरील पूरबुडीत पुलाजवळ नव्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहतूक ४ जूनपासून ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी
हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा आणि कुरखेडा-तळेगाव-खेडेगाव-अंतरगाव-पुराडा हे मार्ग निश्चित केले. जड वाहनांसाठी वडसा–आरमोरी–वैरागड मार्ग वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पण प्रत्यक्षात कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा हे मार्ग वापरणे म्हणजे रोजचा जीव मुठीत घेऊन प्रवास करणे. आदेश झाले, पण रस्त्यांची डागडुजी, दुरुस्ती, सुरक्षेची कोणतीही कार्यवाही झाली नाही.

शालेय विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्णांचे हालहाल हृदयद्रावक

वाहतूक खोळंब्याचा मोठा फटका शालेय विद्यार्थी, कर्मचारी तसेच रुग्णांनाही बसत आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नाहीत. रुग्णवाहिका खड्ड्यांमधून मार्ग काढताना जीवघेणा विलंब होतोय. रोजचाच प्रवास आता संकटमय झाला आहे. अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर असून गावागावांतील जनतेचा संयम सुटू लागला आहे.तालुकास्थळी ये-जा करणे कठीण झाले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विकास फक्त कागदावरच

एकीकडे ‘विकासाच्या गप्पा’ सुरू असताना, तर दुसरीकडे रस्त्यांची उघड उघड उध्वस्त अवस्था. नव्या पुलाचे काम गतीने सुरू असले तरी पर्यायी मार्गांची वाट लागलेली आहे. प्रशासनाने तत्काळ या मार्गांची डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनतेचा उद्रेक अनिवार्य आहे.

तालुका ठप्प – जबाबदार कोण?

वाहतुकीचा गळा घोटणाऱ्या परिस्थितीकडे प्रशासनाचे कानाडोळे जनतेच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. सती नदीवरील वाहतूक ठप्प झाल्याने संपूर्ण कुरखेडा तालुका ठप्प झाला असून ‘विकास’ हा शब्द सध्या केवळ कागदावरच उरला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Kurkhedanews #Kurkheda #SatiRiver #TrafficHaltedn#RoadsInCrisis #PotholeHell #CollapsedConnectivity #NegligentAdministration #PublicSuffering #StudentsStruggle #EmergencyBlocked #WhereIsDevelopment
#VoicesFromTheGround #RuralReality #TheGadVishva #australia vs west indies #gpat result 2025 merit list #inter vs river plate #roston chase
#कुरखेडा #सतीनदी #वाहतूकठप्प #पर्यायीमार्ग #खड्ड्यांचेरस्ते #प्रशासनगप्प #तालुकावेठीस #विद्यार्थ्यांचेहाल #रुग्णवाहूअडखळते #विकासकुठेआहे?#जनतेचाआक्रोश #Theगडविश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here