कुरखेडा : शेतात गांजाचं उत्पादन,विक्रीच्या आधीच १.१२ लाखांचा माल जप्त

777

– आरोपी जेरबंद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० मे : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीवर आळा घालण्याच्या मोहिमेला गती देताना गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुरखेडा तालुक्यातील दामेश्वर येथे गांजाची अवैध शेती करून विक्रीची तयारी करणाऱ्या इसमाला अटक करून त्याच्याकडून १.१२ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १९ मे २०२५ रोजी पोलीस मदत केंद्र, मालेवाडाच्या पथकाने केली. गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पोनि. शैलेद्र ठाकरे (पोस्टे कोरची) व पोउपनि. अभिजित पायघन (मालेवाडा) यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने संशयित मोहन यशवंत कोवाची (वय ४२) रा. दामेश्वर याच्या घरावर छापा टाकला.
झडतीदरम्यान चार चुंगळ्यांमध्ये साठवलेला २८.०५० कि.ग्रॅ गांजा मिळून आला. त्यात पानं, फुलं, बोंडं व बिया असलेल्या कॅनाबिस वनस्पतीचा समावेश होता. अंमली पदार्थाची एकूण किंमत १,१२,२४०/- इतकी आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने स्वतःच्या शेतात गांजाचं उत्पादन करून विक्रीसाठी साठवून ठेवल्याची कबुली दिली. यावरून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ५९/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. अभिजित पायघन करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोउपनि. आकाश नाईकवाडी, पोअं. साजन मेश्राम, तसेच पोलीस कर्मचारी मसफौ., मंडपे, मळकाम, म्हशाखेत्री, हुंडरा यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here