– विनोद खूणे अध्यक्ष, विनायक मेश्राम उपाध्यक्ष
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १४ : तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी सहकारी भातगिरणी सहकारी संस्था, कुरखेडा यावर पुन्हा एकदा पोरेड्डीवार गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकताच पार पडलेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत विनोद खूणे यांची अध्यक्ष तर विनायक मेश्राम यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली.
संचालक मंडळाची निवडणूक यापूर्वीच अविरोध झाल्याने खेमनाथ पाटील डोंगरवार, विनोद खूणे, विनायक मेश्राम, उद्धव गहाणे, मोनेश मेश्राम, गीता धाबेकर, शालीक मेश्राम, फिरोज पठान, वासूदेव सयाम हे ९ सदस्य संचालक म्हणून आधीच निवडून आले होते. आजच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीने पोरेड्डीवार गटाच्या एकछत्री वर्चस्वाला अधिकृत शिक्का बसला.
ही निवडणूक जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार यांच्या नेतृत्वात पार पडली.
निवडणूक निकाल जाहीर होताच गुलाल उधळणी, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, भातगिरणी प्रशासक सुषील वानखेडे, माजी प. स. उपसभापती नवनाथ धाबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस. सी. बूरले व व्यवस्थापक डी. बी. मंगर यांनी निवडणूक प्रक्रीया नेटकेपणाने पार पाडली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GoogleTrending #कूरखेडा #पोरेड्डीवारगट #सहकारीभातगिरणी #गडचिरोलीनिवडणूक #अविरोधनिवड #विनोदखूणे #विनायकमेश्राम #सहकारक्षेत्र #मराठीबातमी #CooperativeElection