– श्रम, संस्कृती आणि निसर्गाच्या नात्याचा उत्सव
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा,( चेतन गहाणे) दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील रामगड गावात पारंपरिक गीतांच्या सूरात धान रोवणीला सुरुवात झाली आहे. गोंड व माडिया जमातींच्या महिलांनी एकत्र येत मांदरच्या ठेक्यावर गाणी गात पारंपरिक पद्धतीने रोपे लावण्याचा उत्सव साजरा केला.

शेतातल्या श्रमात गाण्यांचं बळ मिसळत, निसर्ग, जंगल, पाऊस आणि शेती यांच्याशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं या लोकगीतांतून प्रकट होत आहे. “ही गाणी आमच्या पूर्वजांनी शिकवली आहेत. गात-गात काम केल्यावर दमणूक कमी वाटते, आणि सगळं काम एकजुटीने लवकर पूर्ण होतं,” असं समीर गावडे या स्थानिक शेतकऱ्याने सांगितलं.
धान रोवणीच्या या हंगामात पारंपरिक पूजा, भूमीपूजन आणि हाताने रोपं लावण्याची पद्धत जपली जाते. यंदा समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा आणि उत्साह दोन्ही वाढले आहेत.
रामगडच्या शेतांतील ही सामूहिक मेहनत आणि गाणी म्हणजे आदिवासी संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे. “ही गाणी फक्त विरंगुळा नाहीत, ती आमच्या संस्कृतीचा आत्मा आहेत,” असे मत गावातील ज्येष्ठांनी व्यक्त केले.
या परंपरेचे जतन व संवर्धन होण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सांस्कृतिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यामुळे हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #DhanRovni #Ramgad #TribalCulture #GondiSongs #Gadchiroli #Kurkheda #FarmingFestival #MadiaTribe #GondCommunity #TraditionalFarming #FolkHeritage #PaddyCultivation #PlantingSongs #IndigenousLife #CulturalTradition
#धानरोवणी #रामगड #आदिवासीसंस्कृती #गोंडीगीत #गडचिरोली #कुरखेडा #शेतीउत्सव #माडियाजमात #गोंडसमाज #परंपरागतशेती #लोकसांस्कृतिकवारसा #धानपिक #रोपणगीत #आदिवासीजीवन #सांस्कृतिकपरंपरा