– मोहगाव साधूटोला फाट्याजवळ भीषण घटना
The गडविश्व
ता. प्र / कुरखेड, दि. २५ : कुरखेडा-पलसगड मार्गावर मोहगांवजवळील साधूटोला फाट्याजवळ आज (२४) दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
ट्रॅक्टरला साइड देण्याच्या प्रयत्नात दूचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. निलकंठ शामराव मडावी (३०, रा. जामटोला, रामगड) या तरुणाचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला विक्की यशवंत उसेंडी (४०, रा. जामटोला, रामगड) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक व जखमी हे दोघेही काही कामानिमित्त देसाईगंज-वडसा येथे जाऊन परत जामटोला येथे येत असताना हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीला तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवून पंचनामा केला. दरम्यान, या अपघाताचा अधिक तपास की कुरखेडा पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #accident #breakingnews #latestnews














