कुरखेडा : बिबट शिकार प्रकरणी आरोपींना ६ फेब्रुवारी पर्यंत एमसीआर

652

– आरोपींची नागपूर जिल्हा कारागृहात रवानगी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २८ जानेवारी : वनपरिक्षेत्र पुराडा अंतर्गत येत असलेल्या राखीव वन कक्ष क्रमांक २४४ मध्ये बिबट्याची शिकार करून चमडा, ११ नखे बाळगल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची कारवाई १७ जानेवारी रोजी करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना १८ जानेवारी रोजी कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ जानेवारी पर्यंत ७ दिवसांची वनकोठडी सुनावली होती. दरम्यान पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बि. एच. डिगोळे यांनी आरोपींना २४ जानेवारी रोजी मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी कुरखेडा यांच्यासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींचा ६ फेब्रुवारी पर्यंत M. C. R. मंजुर केला असून तिनही आरोपींची जिल्हा कारागृह, नागपुर येथे रवानगी करण्यात आली आहे.
विनायक मनिराम टेकाम (३९) रा.वागदरा, मोरश्वर वासुदेव बोरकर (४५) रा. रामगड, मंगलसिंग शेरकू मडावी (५०) रा. वागदरा ता.कुरखेडा जि.गडचिरोली असे आरोपींची नावे आहेत.
मंगळवार १७ जानेवारी रोजी वनकर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला असता आरोपींकडून बिबट्याचा चमडा तसेच ११ नखे आढळून आली. दरम्यान चमडा व नखे जप्त जप्त करून आरोपी विरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ५० (c), भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ६४ (१) नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली होती.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Forest) (MCR)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here