– कुरखेडा – कोरची मार्गवर घडला अपघात
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा ( चेतन गहाणे) दि. २३ : मालवाहू ट्रॅक कुरखेडा – कोरची या मुख्य मार्गावरील हेटी पुराडा नजीक पलटून अपघात झाल्याची घटना रविवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीजी ०७ सीएन ७१२० क्रमांकाचा मालवाहू ट्रॅक हा कुरखेडा मार्गे छत्तीसगड राज्यात जात असतांना हेटी-पुराडा नजीक चालकाचे ट्रॅकवरील नियंत्रण बिघडल्याने मुख्य मार्गावर ट्रॅक पलटला. सुदैवाने यात जीवितहानी टळली असली तरी चालक हा दारूच्या नशेत असल्याचे बोलल्या जात आहे त्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. मुख्य मार्गावर ट्रॅक पलटल्याने वाहतूक खोळंबली होती तसेच बघ्यांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती. घटनेची माहिती होताच नजीकचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात कुरखेडा – कोरची मार्गे मोठ्या प्रमाणात दररोज मालवाहू ट्रॅक जात असतात, जिल्ह्यातील लोहखनिज वाहतूक करणारे ट्रॅकही याच मार्गे जात असतात. अनेकदा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने अपघात घडले आहेत. सदर अपघात घडला त्यामध्ये मोठे दगड भरून असल्याची माहिती असून दारूच्या नशेत ट्रकचालक असल्याने या मार्गे जात असलेल्या ट्रकचालकांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #gadchirolicollector #accident #kurkheda )