कुरखेडा : वयोवृद्ध महिलेला KYC साठी १५ किमीचा त्रासदायक प्रवास

296

– स्थानिक तलाठी कार्यालयात सुविधा का नाही? वयोवृद्धांसाठी फिरते KYC युनिट सुरू करण्याची मागणी तीव्र
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१५ : तालुक्यातील सोनेरांगी येथील वयोवृद्ध महिला भागरथा गणपत धूर्वे यांना श्रवण बाळ योजनेच्या KYC प्रक्रियेसाठी तब्बल १५ किमीचा प्रवास करून तहसील कार्यालय गाठावे लागले. पायाच्या दुखण्याने त्रस्त असताना, गावात तलाठी कार्यालय असतानाही त्याठिकाणी KYCची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे धूर्वे यांना जबर त्रास सहन करावा लागला.

गावात असलेल्या सरकारी यंत्रणेकडून मदत मिळण्याऐवजी अशक्त महिलेला मुलगा आणि सून यांच्या सहकार्याने खासगी वाहनाने तहसील कार्यालयात नेण्यात आले. सध्या तालुक्यात पूल कामामुळे वाहतुकीची परिस्थिती बिकट असून, खाजगी वाहनांचे भाडे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशा परिस्थितीत KYC प्रक्रियेच्या नावाखाली वयोवृद्ध नागरिकांची हेळसांड म्हणजे प्रशासकीय असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर ताशेरे ओढले. “सरकार वृद्धांसाठी योजना आणते, पण अंमलबजावणी करताना त्यांचाच विसर पडतो,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. “KYCसाठी तलाठी कार्यालयातूनच सुविधा द्याव्यात, किंवा फिरते KYC युनिट सुरू करावीत,” अशी ठाम मागणी आता उभी राहिली आहे.
या घटनेने प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर आणि वयोवृद्ध, गरीब नागरिकांप्रती असलेल्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “ही केवळ एक घटनेची बाब नसून, संपूर्ण प्रणालीतील त्रुटीचे लक्षण आहे,” असे स्थानिकांनी म्हटले आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन धोरणात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #KYCManmani #वयोवृद्धांचा_अपमान #RuralAdminFailure #ShravanBalYojana #GraminVastav
#तेल_घालणारे_नियोजन #TehsilTorture #ElderlyRights
#MobileKYCची_गरज #प्रशासन_उत्तरदायी_कधी #केवायसीचीहेलपाट #वयोवृद्धांचीहेलसांड #प्रशासनाचाअसंवेदनशीलपणा #स्थानिकस्तरीयसेवा_हवी
#फिरतेKYCयुनिटअवश्यक #ग्रामस्थांचान्यायासाठीलढा
#शासनजागेहो #वयोवृद्धांसाठीसोयीसुविधा #ग्रामिणवाहतूकअडचण
#तालुक्यातीलदुर्व्यवस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here