The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.१४ : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडा येथील स्व. वच्छलाबाई फाये सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे दिली. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि संविधान निर्मितीतील अमूल्य योगदानाचा वेध घेत बाबासाहेबांचा इतिहास प्रभावीपणे उलगडून दाखवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर फाये होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव दोषहर फाये, तर विशेष अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये आणि प्रमुख वक्ते सेवानिवृत्त शिक्षक मुकेश खोब्रागडे सर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वासुदेव मस्के यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विनोद नागपूरकर यांनी तर आभारप शिक्षिका लता राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
