The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : संत निरंकारी मंडळ शाखा कुरखेडाच्या वतीने रविवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १० वाजता दरम्यान प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देऊळबोडी कुरखेडा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
शहर व गावातील पिण्याचा पाण्याचे स्त्रोत स्वच्छ व्हावे याकरीता संत निरंकारी मंडळाच्या वतीने मागील तिन वर्षापासून पूर्ण देशात एकाच दिवशी प्रोजेक्ट अमृत हा उपक्रम राबवत शहर तसेच गावात पाण्याचा स्त्रोत जवळ पाण्याला दूषित करणारा केर कचरा, प्लास्टिक निरंकारी स्वंयसेवकांकडून स्वच्छता अभियान राबवित स्वच्छ करण्यात येते. आज सकाळी निरंकारी सेवादल मंडळाकडून प्रार्थना करीत सेवा कार्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी कुरखेडा शाखेचे मूखी महात्मा माधवदास निरंकारी सेवादल संचालक दिलीप निरंकारी, सेवादल शिक्षक अजय पूस्तोडे, रामदास जराते, गजानन गायकवाड, डॉ. देवेन्द्र शूद्धलवार, मधूकर निनावे, बंटी देवढगले, लतेश नाकतोडे, यशवंत सहारे, मोहीत बोरकर, रोहित खडाधार, मुकेश निनावे, ओमकार प्रधान, प्रमीला प्रधान, आशाताई माकडे, हिराजी मरस्कोल्हे, मनिषा ताराम, ममता पर्वते, सूशीला कवडो तसेच मोठ्या संख्येत निरंकारी स्वंयसेवक हजर होते.
