– गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाने दिले जीवदान
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २६ : कुरखेडा शहरानजीकच्या जंगलातून कुत्र्यांच्या पाठलागामुळे घाबरून गेलेल्या एका चितळाने थेट गावात धाव घेतली. ही धावपळ थेट श्रीराम नगरमधील संगीता मडावी यांच्या घराच्या अंगणात संपली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांना हाकलून लावत त्वरित वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. गोपूळवाड यांच्यासह वनरक्षक एस.डब्ल्यू. गोन्नाडे, सहाय्यक एस.एल. कंकलवार आणि वनमजूरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चितळाला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून तत्काळ पशुवैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात नेले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी तपासणी करून चितळाचे आरोग्य स्थिर असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर चितळाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कक्ष क्रमांक १६६ मधील जंगलात दुपारी १२ वाजता चितळाला सुरक्षितपणे सोडण्यात आले. गावकऱ्यांचे भान आणि वनविभागाची तत्परता यामुळे एका वन्यप्राण्याचे प्राण वाचले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #SpottedDeerRescue #WildlifeProtection #GadchiroliNews #ForestDepartmentAction #AnimalRescueMission #DeerSaved #ChitalInVillage #NatureConservation #MaharashtraWildlife #WildlifeAwareness #HumanAnimalCoexistence
#चितळ_रेस्क्यू #वनविभागाचीकारवाई #कुरखेडाबातमी #वन्यजीवसंरक्षण #गडचिरोलीन्यूज #प्राणीमित्र #जंगलातजिवदान #वन्यजीव_सुरक्षा #महाराष्ट्रवनविभाग
