– परिसरात खळबळ
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : कुरखेडा शहरालगत असलेल्या कुंभीटोला येथील एका शेतकरी मजुराचा मृतदेह सती नदीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख पूनाराम महागु सहारे (वय ५५) अशी असून, ते गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
१७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुनाराम सहारे हे शेतकामावरून घरी परत आल्यानंतर घरच्या कुणाचाही नजरेस न पडता मागच्या बाजूने सती नदीकडे गेले होते. ते मालदुगी परिसरात कामानिमित्त गेल्याची माहिती आहे. मात्र, परतीच्या वाटेवर त्यांनी पुन्हा सती नदी पार केली असता, त्यांच्या जीवाला धोका झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज (१८ जुलै) दुपारी १ वाजताच्या सुमारास गुरे राखण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला सती नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्याने ही माहिती तात्काळ गावात पोहोचवल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अत्यंत विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. अंगावरील कपडे आणि बेपत्ता असल्याची नोंद या आधारावर मृतदेहाची ओळख पुनाराम सहारे यांच्यापर्यंत निश्चित करण्यात आली.
या घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अपघाती मृत्यू की काही संशयास्पद बाब, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
या घटनेमुळे कुंभीटोला गावात हळहळ व्यक्त होत असून, शोककळा पसरली आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #Kurkheda #FarmerLabourDeath #SatiRiver #MissingPersonFound #MysteriousDeath #GadchiroliNews #कुरखेडा #सती_नदी #शेतकरीमजूर #बेपत्ता_व्यक्ती #मृतदेह_सापडला #गडचिरोली_घटना #पोलीसतपास #गावात_खळबळ #दुर्दैवी_मृत्यू #कुरखेडा_पोलीस
