कुरखेडा : अपघातात दुचाकीचालक ठार, एकजण जखमी

780

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा,१५ मार्च : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार १४ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा गावानजीक घडली.
ज्ञानेश्वर सहारे (३७) रा. बेलगाव असे मृतकाचे नाव असून कोकसू नंदेश्वर (६५) रा. येगलखेडा असे जखमीचे नाव आहे.
ज्ञानेश्वर सहारे व कोकसू नंदेश्वर हे दुपारच्या सुमारास स्वगावाकडे दुचाकीने जात असता सावलखेडा गावानजीक त्यांच्या दुचाकीने समोरुन येत असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली. यात ज्ञानेश्वर सहारे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील कोकसू नंदेश्वर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here