The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. २६ : कोरची तालुक्यातील सोनपूर गावातील अंत्यविधीला गेलेले काका-पुतण्या बेडगाव घाटातील सदक नाल्याच्या पुरात वाहून गेले होते. चार दिवसांच्या शोधानंतर २६ जुलै रोजी दुपारी त्यांच्या मृतदेहांचा शोध लागला आहे. मृतकांची नावे देवसाय भावसिंग मडावी (वय ६५) आणि तलवार सुखदेव मडावी (वय ३८, दोघेही रा. सोनपूर) अशी आहेत.
२३ जुलै रोजी हे दोघे कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी दुचाकीने गेले होते. सायंकाळी परतत असताना बेडगाव घाटातील सदक नाल्यावरून जाताना पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते दोघेही वाहून गेले. दरम्यान, त्यांची दुचाकी (क्र. CG 08 AS 9629) रस्त्यालगत अडकलेल्या अवस्थेत सापडली होती.
दरम्यान २६ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सदक नाल्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झाडाला अडकलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या प्रकरणी बेडगाव पोलिस मदत केंद्रात मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोनि. शैलेंद्र ठाकरे व प्रभारी अधिकारी दिनेश खोटेले यांच्या मार्गदर्शनाखाली पु.उ.नि. यशवंत वलथरे करीत आहेत.
हा अपघात आणि त्यातील मृत्यूने संपूर्ण गाव शोकाकुल झाला असून नाल्यांमधील प्रवाहाच्या काळजीविना ओलांडण्याचे भीषण परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #BedgaonGhati #FloodTragedy #MissingPersonsFound #GadchiroliNews #KorchiTaluka #Salkantola #BikeAccident #NalaFlood #MaharashtraTragedy #EmotionalNews #RuralMaharashtra #PoliceInvestigation #SearchOperation #SorrowfulIncident #बेडगावघाट #पूरघटनेचातीव्रतेनेशिकार #कोरचीतलुका #गडचिरोलीबातमी #दुचाकीअपघात #सदकनाळा #वाहूनगेलेलीव्यक्ती #शोकांतिकेबातमी #पोलीसशोधमोहीम #ग्रामीणमहाराष्ट्र #मृतदेहसापडले #भावनिकघटना #पोलीसकार्यवाही
