– भाजपच्या पुढाकाराने जनजागृतीला चालना
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : धानोरा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि जनसामान्यांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. शहरातील आमदार मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच स्थानिक युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी नागरिकांनी विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यानधारणा यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमात योगाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व निवृत्त कर्मचाऱ्यांनीही आपले अनुभव मांडले आणि योग दिनाच्या निमित्ताने समाजात आरोग्यविषयक जनजागृती घडवून आणण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
