The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. २९ : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागाने कारवाईला गती दिली आहे. देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कुरुड आणि देसाईगंज (वडसा) येथील कृषी सेवा केंद्रांची नुकतीच तपासणी करण्यात आली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) कुमारी शितल रामनाथ खोब्रागडे यांनी केली.
तपासणीदरम्यान संबंधित विक्रेत्यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री परवाने, परवान्यांची वैधता, स्टॉक रजिस्टर, बिल बुक, पास मशीन यांची सखोल छाननी करण्यात आली. गोदामातील प्रत्यक्ष साठा आणि कागदोपत्री माहिती याची तंतोतंत पडताळणी करण्यात आली. यासोबतच बियाणे व रासायनिक खतांचे प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुनेही घेतले गेले.
कृषी केंद्र चालकांना तांत्रिक दर्जा असलेल्या व कायदेशीर मंजुरी प्राप्त उत्पादनांचीच विक्री करावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. शेतकऱ्यांची फसवणूक, बोगस मालाची विक्री किंवा अवाजवी दर लावल्यास खत नियंत्रण आदेश 1985, बियाणे कायदा 1966 व बियाणे नियम 1968 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही कुमारी शितल खोब्रागडे यांनी दिला.
कृषी विभागाच्या या तपासणीमुळे बोगस बियाणे व खते विक्रीवर लगाम बसेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. विभागाकडून अशी नियमित तपासणी सुरू राहिल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान टळण्यास मदत होईल, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #WadsaInspection #AgricultureDepartment #SeedAct1966 #FertilizerControlOrder1985 #FarmerWelfare #FakeSeedsCrackdown #AgriServiceCenter #LicenseVerification #QualityControl #CropProtection #GadchiroliAgriculture #AgriInspectionDrive #FarmersRights #AgriculturalMonitoring #StopFakeFertilizers #वडसा_कृषीतपासणी #गडचिरोलीकृषीविभाग #शेतकरीहित #बोगसबियाणे #खतविक्री_नियम #गुणनियंत्रणतपासणी #SeedAct1966 #FertilizerControlOrder1985 #कृषीसेवाकेंद्र #कृषीविभागाचीकारवाई #वडसाबातमी #शेतकऱ्यांचेरक्षण #परवाना_तपासणी #कृषीविकास #QualityCheckAgriculture
