पालोरा जिल्हा परिषद शाळेला इंडिगो पेंट्सचा रंगतदार हातभार

20

– चार तासांत रंगरंगोटी पूर्ण
The गडविश्व
आरमोरी / चेतन गहाणे, दि. १९ : आरमोरी तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आज इंडिगो पेंट्स उत्सवाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत नवा रंग मिळाला. अवघ्या चार ते पाच तासांत शाळेची संपूर्ण इमारत रंगवून तयार करण्यात आली. स्थानिक पेंटर बांधवांच्या योगदानातून पूर्ण झालेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून भरभरून स्वागत होत आहे.
या उपक्रमाची संकल्पना इंडिगो पेंट्सचे अधिकृत डीलर व श्री साई आशीर्वाद पाईपचे मालक मिलिंद रामटेके यांच्या पुढाकारातून आकारास आली. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश हलामे यांच्याशी चर्चा करून त्यांनी हे नियोजन आखले. कामाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी आरमोरीतील पेंटर बांधवांनी एकदिलाने सहभाग घेतला.
उद्घाटनप्रसंगी इंडिगो पेंट्सचे महाराष्ट्र प्रभारी अभय मांडवगोडे, एरिया सेल्स मॅनेजर जितेंद्र विरूळकर, तसेच नवीन मोरे, अंकुश गलफट, निखिल सोमकुवर आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
“नव्या रंगरंगोटीमुळे शाळा विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आणि प्रेरणादायी ठरेल,” असे मत मुख्याध्यापक प्रकाश हलामे यांनी व्यक्त केले.
हा उपक्रम फक्त शाळेच्या सौंदर्यात भर घालणारा नसून, सामाजिक बांधिलकीचे आणि सामूहिक योगदानाचे आदर्श उदाहरण ठरला आहे. इंडिगो पेंट्स आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे पालोरा गावातील शाळा आता नव्या तेजाने उजळली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #armorinews #crimenews #latestnews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here