– जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळ आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने आणि अचूक आढावा घेऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार, मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान, जनावरे, घरे, गोठे, घरगुती साहित्य आणि इतर मालमत्तेची नुकसानीची सविस्तर नोंद घेऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मृत व्यक्ती, पशुहानी आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी लागणाऱ्या मदतीची रक्कम प्राधिकार पत्राद्वारे तत्काळ वितरित करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीवर वेळेत उपाययोजना होण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #HeavyRainfall #NaturalDisaster #DamageAssessment #DistrictCollector #ReliefMeasures #CropDamage #GovernmentAid #DisasterManagement #MaharashtraNews
#गडचिरोली #अतिवृष्टी #नैसर्गिकआपत्ती #नुकसान #जिल्हाधिकारीआदेश #पंचनामा #आपत्तीव्यवस्थापन #शेतीनुकसान #सरकारीमदत #गडचिरोलीबातमी #MaharashtraNews
