“खड्डे पडले, अपघात घडले तर जबाबदार अधिकारीच धरणार” : जिल्हाधिकारी पंडा यांचा इशारा

31

– खड्डेमुक्त रस्ते, ट्रॉमा युनिट, स्पीडब्रेकरसह अपघात प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारींचा ‘ॲक्शन प्लॅन’; दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई होणार
The गडविश्व
गडचिरोली, दि.१५ : “रस्त्यावर खड्डे राहतील आणि त्यातून अपघात घडले, तर जबाबदार यंत्रणांवरच कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिला. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी खड्डे, अपघात प्रवण स्थळे, ट्रॉमा युनिट आणि वाहतूक नियमनाबाबत व्यापक उपाययोजना जाहीर केल्या.
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा संबंधित विभागांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी ठणकावले. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांसह सर्व बांधकाम यंत्रणांना त्यांनी युद्धपातळीवर कामाचे आदेश दिले.

शाळांपुढे स्पीडब्रेकर बंधनकारक – नियमांचे उल्लंघन सहनार नाही

शाळांसमोर स्पीडब्रेकर आणि माहितीफलक बसवण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले. रस्ते बांधकाम करणार्‍या कंत्राटदारांनी याची जबाबदारी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपघात प्रवण स्थळांची पुन्हा पाहणी

“जिल्ह्यात एकही अपघात प्रवण स्थळ नाही” असे सांगितल्यावर जिल्हाधिकारी पंडा यांनी नाराजी व्यक्त केली आणि सर्व विभागांनी संयुक्त पाहणी करून खरी माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. आष्टी, आरमोरी आणि गडचिरोलीतील मुख्य चौकातील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचेही आदेश त्यांनी दिले.

४५ दिवसांत सती नदीवरील पूल पूर्ण करा

कुरखेडा येथील सती नदीवरील अपूर्ण पुलामुळे जनतेला फटका बसत असल्याचे लक्षात घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पाहणी करून ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

ट्रॉमा युनिट, ब्लड बँक, कॅशलेस उपचार योजनेवर भर

अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी कुरखेडा, अहेरी, वडसा आणि आरमोरी येथे ट्रॉमा युनिट व ब्लड बँकेसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. शासनाच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कॅशलेस उपचार योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्याचेही आवाहन त्यांनी केले.

रविवारी ट्रक बंदी, स्पीड कॅमेरे, दारू पिऊन वाहनचालकांवर लक्ष

आठवडी बाजाराच्या दिवशी ट्रक वाहतुकीवर बंदी, ओव्हरस्पीडवरील कारवाई, ई-रिक्षा नियंत्रण आणि ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम यांवर विशेष लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्पीड कॅमेऱ्याद्वारे चलन पाठवण्याचाही निर्णय झाला आहे.

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी धोकादायक ठिकाणी माहितीफलक आणि बॅरिकेटींग प्राधाण्याने लावण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीचे सादरीकरण निता ठाकरे आणि किरण मोरे यांनी केले.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता साखरवाडे, सहायक परिवहन अधिकारी अशोक जाधव, उपअभियंता सुमित मुंदडा, तसेच सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद बांधकाम आणि वाहतूक पोलिस आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews
#Gadchiroli #RoadSafety #PotholeRepair #AccidentPrevention #DistrictCollectorPanda #RoadAccidents #TraumaCare #SpeedBreakers #TrafficRegulation #PublicWorksDepartment #NationalHighways #KurkhedaBridge #GovernmentOrders #ZeroAccidentMission #GadchiroliNews
#गडचिरोली #रस्ता_दुरुस्ती #खड्डेमुक्त_रस्ते #जिल्हाधिकारी_अवश्‍यांत_पंडा #रस्ते_अपघात #रस्ते_सुरक्षा #ट्रॉमा_युनिट #स्पीडब्रेकर #वाहतूक_नियमन #सार्वजनिक_बांधकाम #राष्ट्रीय_महामार्ग #कुरखेडा_पूल #गडचिरोली_बातमी #शासनाचे_निर्देश #अपघातप्रवण_ठिकाण

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here