खते वेळेवर न मिळाल्यास त्वरित तक्रार करा

36

– कृषी विभागाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खते मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र काही ठिकाणी खतांच्या टंचाईची कृत्रिम समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना आता थेट तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट आवाहन केले आहे.
या संदर्भात माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले की, “जर कोणत्याही अधिकृत कृषी विक्रेत्याकडून खते वेळेवर उपलब्ध होत नसतील, खते लपवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असेल किंवा शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल, तर संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर तक्रार करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे.”
तक्रार करण्यासाठी कृषी विभागाने +91 82756 90169 हा हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. हा क्रमांक टोल फ्री असून शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क लागू नये, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

तालुकानिहाय तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक
तालुकानिहाय तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक

कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांनी अशी तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली (बेरक क्र. 1) येथे थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण हे शासनाचे प्राधान्य असून, गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही हिरळकर यांनी ठामपणे सांगितले.
शेतकरी बांधवांनी वेळ वाया न घालवता, कोणतीही अडचण आल्यास तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #FertilizerShortage #FarmerRights #AgricultureDepartment #GadchiroliNews #KharifSeason #FarmerSupport #AgriIssues #ComplaintHelpline #FertilizerSupply #GadchiroliAgriculture

#खतटंचाई #शेतकरीहक्क #कृषीविभाग #गडचिरोलीबातमी #खरीपहंगाम #शेतकरीआंदोलन #कृषीसमस्या #तक्रारक्रमांक #खतेउपलब्धता #गडचिरोलीकृषी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here