गाढवी नदी पुलाजवळ दुचाकी-एसटी बसची भीषण धडक : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

1158

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. २१ : राष्ट्रीय महामार्गावरील विसोरा व शंकरपूर दरम्यान गाढवी नदीवरील पुलाजवळ सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास दुचाकी आणि एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
देसाईगंजवरून कुरखेडाकडे जात असलेली दुचाकी (क्र. MH 33 X 7735) आणि कुरखेडाकडून गडचिरोलीकडे जाणारी एसटी बस (क्र. MH 13 CU 7516) यांच्यात शंकरपूर गावाकडील पुलाच्या वळणावर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दुचाकीस्वार थेट 20 फूट दूर फेकला गेला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृतकाचे नाव महेश मधुकर देशमुख (वय 30, रा. कुरखेडा) असून, तो काही कामानिमित्त देसाईगंज येथे आला होता.

रस्त्याची दुरवस्था अपघाताला कारण?

वडसा-कुरखेडा रस्त्यावरील झाडझुडपे, वळणांवरील अपुरी दृश्यता आणि रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले मोठे खड्डे हे अपघातास कारणीभूत ठरत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या घटनेने रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या प्रकरणाचा तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गेडाम करत आहेत.

#RoadAccident #FatalCrash #GadchiroliNews #DesaiganjUpdate #BikeBusCollision #STBusAccident #Kurkheda #TrafficHazards #PotholeDeath #GadchiroliPolice
#अपघातबातमी #देसाईगंज #गडचिरोली #दुचाकीबसधडक #कुरखेडा #वाहतूकअपघात #रस्ता अपघात #एसटीबस #झालेलाअपघात

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here