The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : महाराष्ट्रातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. जिल्ह्याचे सुपुत्र प्रसाद दिवाकर ताजने यांनी गडचिरोलीचे पहिले प्रमाणित सॉफ्टबॉल प्रशिक्षक होण्याचा मान मिळवला आहे.
प्रसाद ताजने यांनी मे ते जून २०२५ या कालावधीत पंजाबच्या पटियालामधील राष्ट्रीय क्रीडा संस्था (NIS) येथे आयोजित सॉफ्टबॉल कोचिंग प्रशिक्षणात सहभाग घेतला. या प्रशिक्षणात ते द्वितीय श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय प्रशिक्षक मुकुल देशपांडे आणि पलनीत्कर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
प्रसाद ताजने यांच्या या यशामुळे गडचिरोलीच्या क्रीडा विश्वात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गडचिरोली सॉफ्टबॉल संघाचे सचिव प्रा. ऋषिकांत (रिंकू) पापडकर आणि प्रा. रूपाली ऋषिकांत पापडकर यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, येत्या काळात सॉफ्टबॉल खेळ गावपातळीवर पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील, जेणेकरून ग्रामीण भागातून नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकेल.
प्रसाद यांचा हा पराक्रम गडचिरोलीतील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि जिल्ह्याला सॉफ्टबॉल क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #SoftballCoach #PrasadTajne #NISPatiala #SportsAchievement #GadchiroliSports #YouthInspiration #NationalCoach #SoftballIndia #FromNaxalToNational
#गडचिरोली #सॉफ्टबॉल #राष्ट्रीयप्रशिक्षक #प्रसादताजने #NISपटियाला #खेळविकास #गडचिरोलीक्रीडा #युवाप्रेरणा #सॉफ्टबॉलमहाराष्ट्र #NaxalAffectedAreaToNationalStage