The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०७ : तालुक्यातील रांगी येथील पी.एम.श्री. जि.प. उच्च प्राथमिक शाळेत 6 ऑगस्ट 2025 रोजी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आर. जी. मूनधाने फाउंडेशन प्रस्तुत बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हलिहूड अॅण्ड डेव्हलपमेंट (BISLD) द्वारा संचालित आदिवासी उत्थान प्रकल्प धानोरा अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता कावळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक भास्कर झोडगे, तर मार्गदर्शक म्हणून प्रकल्प संयोजक देवरे, मार्गदर्शिका रोहिणी निंबारते व राहुल मातूलकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात रोहिणी निंबारते यांनी व्यसनमुक्तीचे सामाजिक व कौटुंबिक परिणाम सांगत विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक आयुष्य जगण्याचा संदेश दिला.
राहुल मातूलकर यांनी व्यसनमुक्तीवर गीत सादर करून जनजागृती घडवली, तर प्रकल्प संयोजक देवरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सौ. संगीता कावळे यांनी बायफद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देत सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले, तर मुख्याध्यापक झोडगे सरांनी व्यसनांचे दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
या शिबिरात बायफच्या वतीने विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी नेल कटर आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विकास दोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक नंदू जांगी यांनी मानले.
शाळेतील सर्व शिक्षकांचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा सहभाग लाभला.
वर्ग 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला आणि आरोग्यविषयक जागृतीचा लाभ घेतला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
