धानोर्यात हरित सेनेतर्फे शालेय आवारात वृक्षारोपण
– पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १० : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या घोषवाक्याखाली जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा येथे राष्ट्रीय हरितसेना व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. शालेय परिसरात अशोक, करंजी, कडुनिंब, फुलझाडे आदी विविध प्रजातींची रोपे लावून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, शिक्षक प्रशांत साळवे, पी. बी. तोटावार, डॉ. रश्मी डोके, व्ही. एम. बुरमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात कु. रजनी मडावी, कोरेवार मॅडम, आनंदवार मॅडम यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इको क्लब प्रमुख कु. समीक्षा सोनुले व हरितसेनेच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दशमुखे मॅडम यांनी केले, तर आभार हरितसेना प्रभारी एस. एम. रत्नागिरी यांनी केले. या वेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews
