गडचिरोली शहरात दुकानफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश : ४ आरोपी ताब्यात

67

The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली शहरात मागील आठवड्यात व्यापारी दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गडचिरोली पोलीसांनी छडा लावला असून, चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष तपास सुरू होता. 19/06/2025 रोजी दाखल अप. क्र. 426/2025 भादंवि कलम 305(अ), 331(4) अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन पथकाने सीसीटीव्ही फूटेज तपासून व रात्रगस्त वाढवून संशयितांचा मागोवा घेतला.
शहरातील चामोर्शी रोड, धानोरा रोड आणि चंद्रपूर रोडवरील दुकाने फोडणाऱ्या टोळीचा शोध लावून त्यातील चार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. बालकल्याण पोलीस अधिकारी यांच्यामार्फत संबंधितांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात डिटेक्शन पथकातील पो.अं. धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्रागडे व अतुल भैसारे यांनी पार पाडली.
गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा दिलीप खोब्रागडे करत आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliPolice #CrimeControl #JuvenileCrime #ShopTheft #PoliceAction #CrimePrevention #CCTVInvestigation #YouthCrime #LawAndOrder #GadchiroliNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here