– जिल्ह्यात अपघातांचं सत्र गंभीर
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाणे), दि. २२ : तालुक्यातील कढोली – गांगोली या मुख्य मार्गावर खवल्या देवस्थानाजवळ आज मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजता घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने मृतकांचे मृतदेह अक्षरशः छिन्न-भिन्न झाले. घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वैरागडजवळ ग्रामस्थांनी ट्रक अडवत पोलिसांच्या ताब्यात दिला.
प्रज्वल प्रल्हाद अलाम (वय २५) व वैष्णव गुणाजी उईके (वय २२, दोघेही रा. नरचूली, ता. आरमोरी) अशी मृत युवकांची नावे आहेत. हे दोघे एमएच ३३ एजी ९२५६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पळसगाव (ता. कुरखेडा) येथील बहिणीची भेट घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान, खवल्या देवस्थानाजवळ विरूद्ध दिशेने छत्तीसगड वरून कुरखेडा मार्गे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (क्र. सीजी ०४ एनक्यू ८३१७) ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की दोघे युवक ट्रकखाली सापडून जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह क्षणात ओळखू न येण्यासारखे झाले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका आघाव यांच्या नेतृत्वात कुरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात दररोजच्या आधारावर अवजड ट्रक, मालवाहू वाहने मोठ्या संख्येने धावतात. या मार्गांवर नियंत्रण नसल्याने अपघातांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून दुचाकी व छोट्या वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच असून, अपुऱ्या वाहतूक नियंत्रणामुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolnews #Gadchiroli #kurkhedanews #TruckAccident #GadchiroliNews #FatalCrash #RoadAccident #TwoWheelerCrash #TrafficHazard #OverloadedTrucks #AccidentAlert #HighwaySafety #HitAndRun #PoliceAction #RisingAccidents #RoadFatality
#ट्रक_अपघात #गडचिरोली_अपघात #कढोली #दुचाकी_अपघात #वाहतूक_अराजकता #मृत्यू #गडचिरोली_बातमी #अपघाताचे_प्रमाण #अवजड_वाहतूक #पोलीस_कार्यवाही #घातक_वाहनचालक #रोड_सेफ्टी
