The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : आरमोरी-गडचिरोली महामार्गावर 7 ऑगस्टच्या पहाटे घडलेल्या भीषण अपघातात सहा बालकांना भरधाव ट्रकने चिरडले होते. या दुर्घटनेत चार बालकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर पसार झालेल्या ट्रक चालकास गडचिरोली पोलिसांनी केवळ ४८ तासांत गजाआड करत विलक्षण तपास कौशल्य दाखवले.
ट्रक चालक प्रविण बाळकृष्ण कोल्हे (वय २६), सहचालक सुनील श्रीराम मारगाये (वय ४७) दोघेही रा. चिचगड ता. देवरी, जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गडचिरोली – आरमोरी मार्गावरील काटली येथील काही बालके पहाटे व्यायामासाठी असताना गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलवून शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
अपघातानंतर अज्ञात ट्रक आणि चालक बेपत्ता झाले होते. घटनेच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथके स्थापन करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी ट्रकचा माग काढत छत्तीसगडमधून वाहन जप्त केले.
या प्रकरणात चालक प्रविण बाळकृष्ण कोल्हे आणि सहचालक सुनील श्रीराम मारगाये यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #PoliceAction #RoadAccident #TruckDriverArrested #MouzaKatli #ChildDeath #MaharashtraNews #AccidentCase #FastInvestigation #CrimeNews west indies vs pakistan west indies cricket team vs pakistan वेस्टइंडीज बनाम पाकिस्तान rockstar games gta 6 #गडचिरोली #पोलीसकारवाई #अपघात #ट्रकचालकअटक #मौजाकाटली #बालकांचा_मृत्यू #महाराष्ट्रबातमी #रस्तेअपघात #वेगवानतपास #गुन्हेवार्ता
