– पर्यावरणपूरक करिअरला चालना
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : सौर ऊर्जा क्षेत्रात वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आता नव्या करिअरची वाट मोकळी झाली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गडचिरोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५ पासून ‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)’ हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
फक्त दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार असून, गडचिरोली आयटीआयमध्ये २० विद्यार्थ्यांची तर देसाईगंज आयटीआयमध्ये दोन युनिटद्वारे एकूण ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता ठेवण्यात आली आहे.
सौर ऊर्जेचा वापर वाढत असताना, त्यामधून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही वाढत आहेत. युवकांनी काळाची गरज ओळखून या कोर्समध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुरेश चौधरी यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रिया नियमानुसार पार पडणार असून, www.admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. संस्थेतही अर्ज भरण्याची आणि निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शासकीय आयटीआय, गडचिरोली येथे थेट संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #SolarTechnician #SolarEnergy #GreenJobs #ITIGadchiroli #VocationalTraining #IndustrialTraining #CareerOpportunities #GovernmentITI #DesaiganjITI #RenewableEnergy #NewCourse2025 #SkillDevelopment
#सौरऊर्जा #सोलरटेक्निशियन #ITIगडचिरोली #औद्योगिकप्रशिक्षण #रोजगारसंधी #देसाईगंजITI #ग्रीनएनर्जी #शासकीयआयटीआय #गडचिरोली बातमी #करिअरमार्गदर्शन #व्यवसायशिक्षण #नवीनकोर्स2025
